आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : खुनाचा आरोपी धनंजय देसाईच्या पत्नीने नाकारला 'हिंदुत्व शौर्य पुरस्कार'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : आरोपी धनंजयची पत्नी रसिका
पुणे - मुस्लिम इंजिनिअर मोहसीन शेखच्या हत्येच्या आरोपात जेलमध्ये अटकेत असलेला हिंदू नेता धनंजय देसाईच्या पत्नीने ‘हिंदू शौर्य पुरस्कार’ स्वीकारण्यास नकार दिला आहे. समस्त हिंदू आघाडी मंचतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पती धनंजय देसाई तुरुंगातून सुटल्याशिवाय कोणताही पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे त्याची पत्नी रसिकाने स्पष्ट केले. रसिकाच्या या पवित्र्यानंतर हिंदू आघाडी मंचनेही यू टर्न घेतला आहे. रसिका यांच्या भावनांचा आदर करत कार्यक्रम रद्द करत असल्याचे या संघटनेने स्पष्ट केले आहे.

प्रमोद मुतालिक यांच्या हस्ते मिळणार होता सन्मान
धनंजय यांच्यावतीने त्यांच्या पत्नी रसिका यांना श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. कार्यक्रमाशी संबंधित शिवसेना नेते मिलिंद एकबोटे यांनी याबाबत सांगितले की, धनंजय निर्दोष असून त्याच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. या पुरस्काराशी शेख यांच्या हत्येचा काहीही संबंध नसल्याचेही मिलिंद म्हणाले.
संघालाही होते निमंत्रण
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमासाठी अनेक संघटनांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही समावेश आहे. मात्र या कार्यक्रमाशी काहीही देणेघेणे नसल्याचे संघाच्या एका नेत्याने स्पष्ट केले.
कोण आहे धनंजय देसाई?
देसाई हिंदू राष्ट्र सेनेचे नेते आहेत. या वर्षीच 2 जून ला पुण्यात 28 वर्षीय मोहसीन शेख याची काही लोकांनी मारहाण करून हत्या केली होती. हिंदू राष्ट्र सेनेने शेखवर त्याने त्याच्या फेसबूक पेजवर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात अपमानकारक फोटो अपलोड केल्याचा आरोप लावला होता. घटनेनंतर पुण्यात हिंसाचार भडकला. शेखच्या खुनाच्या आरोपात देसाईसह 21 जणांना अटक करण्यात आली. सध्या ते सर्व तुरुंगात आहेत.
पुढे पाहा, हिंदू संघटनांनी सादर केलेले पोस्टर