आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhangar Samaj & Lingayat Samaj Morcha Andolan In Maharashtra

NEWS @ MH: धनगर, लिंगायत समाजाचे विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: धनगर समाजास अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी पंढरपूर ते बारामती पदयात्रा मंगळवारी निघाली आहे. 21 जुलै रोजी ती बारामतीत पोहचेल)
पुणे- निवडणुका जवळ आल्या की सरकारमधील वेगवेगळे घटक, कर्मचारी, शिक्षक यांच्यासह विविध समाज आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवत असतात. त्याचाच भाग म्हणून मागील काही महिन्यांपासून अनेक सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी आंदोलन झाली. आता तशीच आंदोलन राज्यातील धनगर व लिंगायत समाज करीत आहे. अनुसूचित जमातीत समाविष्ठ करावे यासाठी धनगर समाज तर, ओबीसी वर्गाचा दर्जा मिळावा म्हणून लिंगायत समाजाने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून राज्यातील वेगवेगळ्या शहरात व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी व तहशीलदार कार्यालयावर मंगळवारपासून मोर्चे काढण्यात येत आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा फायदा मिळावा या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंढरपूर ते बारामती पदयात्रेस पंढरपूरातून श्री विठूरायाचे दर्शन घेऊन मंगळवारी सुरुवात करण्यात आली. आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्त्वाखाली पदयात्रेत सुमारे सात ते आठ हजार धनगर समाजबांधव सहभागी झाले आहेत. आज ही पदयात्रा माळशिरस तालुक्यातील वेळापूर, अकलूजमध्ये एल्गार पुकारणार आहे. अकलूज, इंदापूर, वालचंदनगर, भवानीनगरमार्गे ही यात्रा येत्या 21 जुलै रोजी बारामती येथे दाखल होणार आहे.

धनगर जमातीचा भारतीय राज्यघटनेनुसार आदिवासी जमातीच्या यादीमध्ये (अनु. क्र. 36) समाविष्ट आहे. मात्र, या सवलतीपासून समाजाला जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे, असा आरोप यावळी नेत्यांनी केला. पदयात्रेच्या मध्यभागी अहिल्यादेवी होळकर यांची आकर्षक आणि भव्य मूर्ती रथात ठेवण्यात आलेली होती. राज्यातून आलेल्या हजारो समाजबांधव रथाच्या बरोबर चालत होते.
ढोल, भेदिक गाणी आणि टोप्यांनी वेधले सर्वांचे लक्ष- पदयात्रेच्या अगोदर येथील शिवाजी चौकात वातावरण निर्मितीसाठी धनगर समाजातील बांधव ढोलच्या तालावर नाचून धनगरी ओव्या म्हणत होते. या वेळी समाजातील काही मंडळींनी पोवाडे, भेदिक गाणी गायली. या वेळी भटुंबरे येथील शंभर ते सव्वाशे धनगर समाज बांधवांनी गळ्यामध्ये पिवळ्या रंगांचे पंचे आणि डोक्यावर गांधी टोप्या परिधान केलेल्या होत्या. या टोप्यावर एका बाजूला आम्ही भटुंबरेकर तर दुसर्‍या बाजूला लढा आरक्षणाचा असा मजकूर लिहिल्यामुळे सर्वांचे आकर्षण ठरल्या.
घोषणांनी परिसर गेला दणाणून- या वेळी अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, उठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही, आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुच्र्या खाली करा आदी घोषणांनी परिसर दणाणून गेलेला होता. आंदोलनात सादर करण्यात आल्या ओव्या... उठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो...
पुढे वाचा, लिंगायत समाजाच्या आंदोलनाबाबत...