आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण ढाेबळेंच्या मुलीचे ३० तोळे सोने लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री लक्ष्मण ढाेबळे यांच्या मुलीचे कारमध्ये ठेवलेले ३० तोळे सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. याप्रकरणी बंडगार्डन पाेलिसांत तक्रार देण्यात आली आहे.ढोबळे यांच्या कन्या काेमल साळुंखे २३ सप्टेंबर राेजी रात्री कॅम्पमधील एसजीएस माॅलसमाेर रेंज राेव्हर कार नाे पार्किंगमध्ये उभी करून वहिनींसाेबत माॅलमध्ये गेल्या. चालक कारमध्येच हाेता. मात्र, काही वेळाने ताे लघुशंकेसाठी गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने कारचा दरवाजा उघडून सीटवर ठेवलेली पर्स लंपास केली. या पर्समध्ये साळुंखे यांचे ३० ताेळे साेन्याचे दागिने हाेते.
बातम्या आणखी आहेत...