आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिल दाेस्ती'चा अाज पुण्यात थ्रीडी राॅक काॅन्सर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘मस्ती नाय तर दाेस्ती नाय' असं म्हणत मैत्रीचा नवा फंडा सांगणारी मंडळी म्हणजे झी मराठीवरील ‘दिल दाेस्ती दुनियादारी’ या मालिकेतील दाेस्तांची गँग. ही मित्रमंडळी गुरुवारी (३० जुलै) पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिरात ‘थ्रीडी राॅक काॅन्सर्ट’या कार्यक्रमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमाेर अापली कला सादर करणार अाहेत.

मुंबईत एकाच फ्लॅटमध्ये राहणारा सुजय, कैवल्य, अाशुताेष, अॅना, मीनल अाणि रेश्मा या सहा दाेस्तांची कथा अाजच्या पिढीच्या गरजा, त्यांची मानसिक स्थिती, त्यांची अाव्हाने हे संगळ रंजक स्वरूपात मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमाेर मांडत अाहेत. प्रेक्षकांच्या मनात या पात्रांविषयी असलेली उत्सुकता, त्यांना भेटण्यासाठी असलेली अाेढ लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत थेट पाेहोचण्यासाठी माेफत थ्रीडी राॅक काॅन्सर्टचे अायाेजन करण्यात अाले अाहे. या कार्यक्रमात झी मराठीवरील सारेगमपच्या मागील पर्वाची विजेती जुइली जाेगळेकर अाणि सहकारी ‘अगम्य बँड’चे सादरीकरण करणार अाहेत.