आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipak Paigude Confidence To Win Mns In Pune Loksabha

शिरोळे, बापट सोपे उमेदवार; पुण्यात मनसेचा विजय निश्चित- दीपक पायगुडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित आहे. भाजपचे संभाव्य उमेदवार अनिल शिरोळे, गिरीश बापट हे तुलनेने माझ्यासाठी सोपे उमेदवार आहेत. मात्र विरोधक कोणीही असो. राज ठाकरेंनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून दाखविणार असल्याचे मनसेचे पुण्यातील लोकसभा उमेदवार दीपक पायगुडे यांनी म्हटले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर पायगुडे यांनी प्रथमच पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज ठाकरेंनी माझ्यावर जो विश्वास दाखविलेला आहे तो सार्थ ठरविणार आहे. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली त्यानुसार मोदींना माझे समर्थन राहील. मात्र पुण्यात मी मोदींच्या नावाने तर पुण्याच्या विकासासाठी मत मागेन. पुण्यात नदी स्वच्छता, सार्वजनिक वाहतूक, प्रदूषण आदी मुद्यांवर निवडणूक लढविणार आहे. पुण्यात मनसेची निर्णायक ताकद आहे, त्यामुळे विजय सोपा आहे. आपण 20 वर्षापासून राजकारणात आहे. या काळात अनेक पक्षांत आपले मित्र व हितचिंतक आहेत त्याचाही मला फायदा होईल, असेही पायगुडे यांनी सांगितले.
पुढे वाचा, पक्षात, घरात भांडणे असल्याशिवाय मजा येत नाही, असे का म्हणाले दीपक पायगुडे...