आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीयवाद हा अन्नासोबत भरवला जातो, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - ‘घरात जेवणाच्या वेळी लहान मुलांसमाेरच देश, जातीविषयी किंवा अारक्षणाविषयीची मते अापण बाेलून दाखवताे. हे सर्व विचार घेऊनच मुले शाळेत जातात अन् आपल्या वर्गातील दुसऱ्या मुलांची धर्म जात शोधू लागतात. जातीय मतभेद, जातीयवाद हा घरातूनच अन्नासोबत भरवला जातो. म्हणून शाळांमधून शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा विद्यार्थ्यांना देशातील सर्व जाती-धर्मांची समंजस माहिती असणारा उत्तम माणूस बनवले पाहिजे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी साेमवारी व्यक्त केली.

बारामती येथे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते. ‘सध्या नव्याने माध्यम क्षेत्रात येणाऱ्या नवागतांवर फार मोठ्या जबाबदाऱ्या अाहेत. फक्त वर्तमानपत्रांच्या मथळ्यावरून अन् देशात काय घडेल याचा अंदाज बांधता येत नाही. तसेच दूरचित्रवाणीवर काय बातम्या तसेच चर्चेतील आरडाओरडा पाहता अंदाज बांधणे अशक्य आहे. सोशल मीडियातून आदळणाऱ्या माहितीच्या संक्रमण अवस्थेत माध्यम आहेत. आज माध्यमांची अवस्था फार विचित्र बनली असून दोन वर्तमानपत्रांच्या बातम्यांतील फरक लक्षात घ्यावा लागतो. पत्रकार हा कोणत्याही पक्षाच्या विचारसरणीचा नसतो. मात्र राजकीय पक्षांची विचारसरणी ही या देशाच्या नाडीशी, मातीशी, गरीब जनतेशी, देशाच्या संस्कृतीशी किती जोडली आहे का? हे तपासले पाहिजे,’ असे मतही डाॅ. पटेल यांनी व्यक्त केेले.
 
जाती-धर्म गळून पडतील
मार्शलमॅकनॉलने सर्व जग लहान खेडं होणार असल्याचे भाकीत केले तेव्हा जगाने त्याला वेडे ठरवले हाेते. मात्र इंटरनेटमुळे अाता जग खूप लहान बनत चालले आहे. कसले धर्म अन् जाती आणि देश घेऊन बसलाय. हे सर्व गळून पडणार आहे. कारण जगातील प्रत्येकाशी आता सहज बोलता येईल. संयमी पत्रकारितेची गरज आहे, असे मत डाॅ. पटेल यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...