आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- ‘प्रजासत्ताक दिनाच्या शताब्दी वर्षात भारत आजच्याइतका एकात्म, सार्वभौम असेलच याची खात्री देता येणार नाही, अशी आज अराजकी अवस्था आहे. त्यामुळे अराजकाचा धोका टाळण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी केले.
‘असा घडला भारत’ या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक सुहास पळशीकर, ग्रंथाचे संपादक सुहास कुलकर्णी व मिलिंद चंपानेरकर उपस्थित होते. केतकर म्हणाले की, स्वतंत्र झाल्यापासूनच देशात अराजकतेची लक्षणे दिसत होती. साठच्या दशकात प्रादेशिक पक्ष झपाट्याने जन्माला आले. विविधतेतील एकता टिकवून ठेवण्याचे खरे आव्हान आपल्यापुढे असताना 16-17 कोटींच्या पाकिस्तानची भीती आपण का बाळगतो,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.