आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... आली माझ्या घरी ही दिवाळी, लक्ष्मीपूजनाच्या तयारीची लगबग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शनिवारी भल्या पहाटे नरक चतुर्दशीचे अभ्यंग स्नान केल्यानंतर घराघरांतील लक्ष्मीपूजन आणि व्यापारीवर्गाचे पूजन रविवारी असल्याने पूजेसाठी केरसुण्या, देवीप्रतिमा, फुले आणि पूजासाहित्याच्या खरेदीची लगबग मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह राज्यातील अनेक शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लक्ष्मीपूजनासाठी रविवारी सायंकाळी 5.43 पासून रात्री उशिरापर्यंतचे मुहूर्त असल्याने या काळात घरातील तसेच दुकानांतील पूजा करता येणार आहेत. लक्ष्मीचे प्रतीक असणारी केरसुणी तसेच प्रत्यक्ष देवीप्रतिमा, चांदीची नाणी यांच्या खरेदीसाठीही बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत.

लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळीत व्यापारी वर्गासाठी तसेच घेरगुती पूजनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो. व्यापारीवर्गाची नव्या चोपड्या, हिशोबवह्या, दैनंदिनी खरेदी करण्याची तयारी सुरू आहे. या मुहूर्तावर नव्या वस्तूंची खरेदीही केली जात असल्याने इलेक्ट्रॉनिक्स तसेच होम अप्लायन्सेसची
दुकाने गर्दीने फुलली आहेत.

जेजुरी गडाकर पारंपरिक दिवाळी
भारतीय लोकदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर जयाद्री मित्र परिवाराच्या वतीने पारंपरिक दिवाळी मोठ्या उत्साहात सुरू झाली असून यात खंडोबाच्या ऐतिहासिक प्रिय असलेला भंडारा ( हळद ) दिवटी -बुदली, कोटम्बा अशा लोकपारंपरिक वस्तूंची सजावट हे विशेष आकर्षण होते.

जेजुरी गडावर शनिवारी साज-या झालेल्या तेजोमय दिवाळीत जयाद्री मित्र परिवारच्या जयाद्री कन्या कोमल तुषार हेंद्रे व दीपाली कादबाने, पूनम उबाळे, दीपा लांगी, काजोल उबाळे, सोनाल लांगी यांनी सहभाग घेतला होता, तर मूर्तिकार-चित्रकार सदानंद शिंदे, राजू चव्हाण, भावना लांगी आदींनी विशेष सहकार्य केले, श्री मार्तंड देवसंस्थान व पुजारी सेवक मंडळाकडून दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खंडोबा देवास नवीन पोशाख आरती भूपाळी अशा धार्मिक कार्याने सुरुवात झाली. पारंपरिक प्रथेनुसार समस्त गुरव पुजारी, ब्राह्मण, गावकरी मानकरी भक्तांच्या मानाच्या पूजा अर्चा होत असतात. (छाया - विजयकुमार हरिश्चंद्रे )