आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dnyaneshwar And Tukobaray Dindi News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भेटी लागी जीवा : भवानी पेठेत ज्ञानोबा, तुकोबांच्या पादुका दर्शनासाठी गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शनिवारी सायंकाळी पुण्यात दाखल झालेल्या ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखींचा मुक्काम आज पुण्यातच आहे. सोमवारी या दोन्ही पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत. दरम्यान, रविवारी पुण्यात भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरात भावीकांनी पादुकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रविवार असल्यामुळे आज सायंकाळी गर्दीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुण्यामध्ये वारीत सहभागी होणा-या सर्व वारकरी बांधवांसाठी विविध प्रकारच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. डॉक्टरांनी घेतलेल्या शिबिरामध्ये वारक-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वारक-यांनी मोठ्या प्रमाणावर या सेवेचा लाभ घेतला.
पालखी सोहळ्यातील रविवारची भवानी पेठेतील छायाचित्रे पाहा पुढील स्लाइड्सवर...