आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यनगरीतून बाहेर पडल्यावर दिवेघाटातून जातांना लाखो वैष्णवांचा मेळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे मुक्कामी दोन दिवस राहिल्यानंतर बुधवारी वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. पालखीच्या आगमन आणि मुक्कामामुळे पुण्यात दोन दिवस उत्साह आणि भक्तीचे वातावरण होते. पुणेकरांनी वैष्णवांच्या मेळ्याचे भक्तीभावाने स्वागत करत त्यांची मनोभावे सेवा केली. लाखो वारक-यांना पुणेकरांनी अन्नदान केले. बुधवारी ज्ञानोबा माऊलींची पालखी सासवड मुक्कामी आली आहे तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे मुक्काम करणार आहे.

ज्ञानोबा-तुकाराम महाराजांची पालखी सोमवारी पुणे मुक्कामी आली होती. त्यानंतर संपूर्ण पुण्यनगरी टाळ-मृदूंगाच्या तालावर भक्तीरसात न्हाऊन निघाली. ज्ञानोबा माऊलींची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदीरात आणि तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेत निवडूंगा विठ्ठल मंदीरात विश्रामासाठी थांबली होती. दोन्ही ठिकाणी भजन, किर्तनाने वातावरण भक्तीमय झाले होते. लोखो लोकांनी दोन दिवस संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले.