आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पुंडलिका वरदे हरि विठ्ठल ! भक्तीचा सोहळा अनुभवा याच देहि याच डोळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे घर संसाराची सारी चिंता मागे टाकून तुकोबाच्या पालखीतील वारकरी अकरा दिवसांचा 150 किलोमीटरचा पायी प्रवास करून मंगळवारी सकाळी आठ वाजता बेलवाडी (ता.इंदापूर) येथे पोहोचले. पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणात ‘पुंडलिका वरदे हरि विठ्ठल’च्या गजरात उत्साहाने धावले. झेंडेकरी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, वीणेकरी यासह आबालवृद्ध देहभान विसरून धावल्या, तर असंख्य भाविकांनी भक्तीचा हा सोहळा याच देहि याच डोळा अनुभवला.

ज्ञानोबा माऊलींची पालखीही अशाच उत्साहात पंढरीच्या वाटेने निघाली आहे. माऊलींच्या पादूकांना निरास्नान घालण्यात आले. यावेळी वारक-यांच्या उत्साह शिगेला पोहचला होता.

पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा, माऊलींच्या पालखीची आणखी छायाचित्र.

सर्व छायाचित्र- प्रदीप गुरव आणि सागर शिंदे.