आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्हारींच्या घरी माऊली आली, खंडेरायाच्‍या जेजुरीत पालखीचे आगमन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासवड - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे गुरुवारी सायंकाळी खंडेरायाच्या सुवर्णनगरी जेजुरीमध्‍ये आगमन झाले आहे. यावेळी भंडारा उधळून माऊलींचे स्वागत करण्यात आले.
 
विठू नामाचा जयघोष आणि सडा-रांगोळी केलेल्या मार्गावरुन माऊलींच्या पालखीने गुरुवारी जेजूरीकडे प्रस्थान केले होते. सासवडमधून मोठ्या भक्तीभावाने वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. 
 
यावेळी सासवडकरांनी पालखी मार्गावर सडा-रांगोळी केली होती. लहान-लहान वारकरीही माउलींच्या पालखी दर्शनाला सकाळीच हजर होते. डोईवर सावळा विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती घेऊन ग्रामीण भागातील महिलांची पाऊले विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने निघाली आहेत. 
बातम्या आणखी आहेत...