आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माउलींच्या नामघोषात पालखी दिवेघाटापार, तुकोबांच्या पालखीचा लोणीत मुक्काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माउलींच्या नामाचा जयघोष करत, टाळ-मृदंगाच्या साथीने माउलींच्या पालखी सोहळ्याने सोमवारी दिवेघाटाची अवघड चढण पार केली आणि सोहळा सासवड मुक्कामी विसावला. तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोमवारी लोणीत मुक्काम होता.
पुण्यातला दोन रात्रींचा मुक्काम आणि पाहुणचार आटोपून सकाळी साडेसातच्या सुमारास माउलींच्या पालखी सोहळ्याने हडपसरमार्गे प्रस्थान ठेवले. तर तुकोबांच्या पालखीचा सोहळाही हडपसरमार्गे प्रस्थान ठेवत होता. हडपसरला पहिला विसावा घेताना दोन्ही पालख्या सोबत होत्या. पुढे माउलींचा सोहळा उजवीकडे सासवड फाट्याला वळला तर तुकोबांचा सोहळा सरळ सोलापूर रस्त्याने लोणीच्या दिशेने निघाला.

माउलींच्या पालखीने दिवेघाट चढायला सुरुवात करताच वारकर्‍यांच्या मुखी ओव्या, अभंग, विराण्या, हरिपाठाचा घोष निनादू लागला. माउलींचा पालखीरथही हायटेक असल्याने बैलांची जिवा-शिवाची जोडी सावकाशपणे पण सहजतेने चढ चढत होती. सायंकाळी उशिरा पालखी सासवडला मुक्कामी पोचली.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही काही अंतर पालखीसोबत पदयात्रा केली.