आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिनामाच्या जयघोषात माऊलींची पालखी निघाली, अाळंदीत वारक-यांची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळी बुक्का, गळ्यात वीणा आणि ओठांवर ज्ञानोबा माउलींचा जयघोष, अशा रूपात लक्षावधी वारक-यांच्या साक्षीने आळंदी येथून गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. प्रदक्षिणेनंतर माउलींचा पालखीसोहळा आळंदी येथेच आजोळघरी विसावला. शुक्रवारी हा मेळा पुण्यनगरीत दाखल होणार आहे.
गुरुवारी पहाटेपासून माउलींच्या प्रस्थान सोहळ्याचे विविध धार्मिक विधी सुरू झाले. काकड्यानंतर महास्नान, महापूजा, पाद्यपूजा, दर्शनबारी, मानक-यांचे सत्कार, महाप्रसाद आदी विधी संपन्न झाले. दिवसभर भाविकांनी माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी सातनंतर माउलींची पालखी प्रदक्षिणेला निघाली. रात्री दहाच्या सुमारास माउलींच्या पालखीचे प्रस्थान झाले आणि पंढरीच्या दिशेने पाऊले टाकत पालखी सोहळा पहिल्या मुक्कामासाठी आळंदी येथेच आजोळघरी विसावला.

श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, सोहळाप्रमुख बाळासाहेब आरफळकर यांच्यासह आळंदी देवस्थान समितीचे सर्व विश्वस्त, फडकरी, दिंडीचे प्रमुख आदी याप्रसंगी उपस्थित होते.

तुकाेबांचीपालखी अाकुर्डीत
बुधवारीदेहूतून पंढरीच्या दिशेने निघालेली संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी गुरूवारी पिंपरी- चिंचवड परिसरात दाखल झाली. अाकुर्डी परिसरातील भाविकांनी तिचे जल्लाेषात स्वागत केले.
बातम्या आणखी आहेत...