आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mauli Palkhi Departed From Alandi, Staying Grandparents Home

माउलींचे प्रस्थान; इंद्रायणीकाठी फुलला भक्तीचा मळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - माउलींच्या ओव्यांचा जागर करत रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो वारक-यांनी विठुनाम व माउलींचा गजर करत या पालखी प्रस्थानाला मानवंदना दिली. रात्री उशिरा नगर प्रदक्षिणा करून ही पालखी प्रथेनुसार आळंदीमधील आजोळघरी मुक्कामास गेली. सोमवारी पुण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल.

शनिवारी तुकोबारायांच्या पालखीने प्रस्थान केले. रविवारी पहाटेपासून आळंदीतील समाधी मंदिरात घंटानाद, काकडआरती, महापूजा, नैवेद्य असे धार्मिक विधी झाले. त्यानंतर भाविकांसाठी दर्शनबारी सुरू करण्यात आली. या वेळी वारक-यांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर महानैवेद्य दाखवून माउली विश्रांतीसाठी गेली. सायंकाळी पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू झाला. सजवलेल्या नव्या बॅटरी रथातून माउलींच्या पादुका नगर प्रदक्षिणेसाठी निघाल्या. या वेळी दुतर्फा वारक-यांनी फेर धरला होता. मानाच्या 47 दिंड्यांना या वेळी श्रीफळ अर्पण करण्यात आले. सोमवारी माउलींची पालखी पुण्यनगरीत मुक्कामास येणार आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... माऊलीच्या पालखी सोहळ्याचे छायाचित्रे...