Home »Maharashtra »Pune» Doctor Student Suicide In Bharathi University Hostel Pune

पुणे: परभणीच्या डॉक्टर विद्यार्थिनीची भारती विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या

प्रतिनिधी | Mar 21, 2017, 11:53 AM IST

  • प्रियांका देविदास भालेराव (वय- 26, रा. पीजी गर्ल्स हॉस्टेल, भारती विद्यापीठ) असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे. प्रियांका मूळची परभणीची होती.
पुणे-भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमडीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या डॉ. प्रियंका देविदास भालेराव (वय २६, मूळ राहणार –वसमत रोड, परभणी) या विद्यार्थिनीने सोमवारी दुपारी वसतिगृहात आत्महत्या केली. प्रियंका वसतिगृहात राहत होती. प्रसूतिशास्त्र शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत होती.
सोमवारी सकाळी त्यांची मैत्रीण शिकवणीसाठी बाहेर पडली. परत आल्यावर तिने दरवाजा ठोठावला, पण प्रतिसाद न मिळाल्याने खिडकी उघडून पाहिले असता प्रियंका गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तातडीने वॉचमन, वसतिगृह अधिकारी व पोलिसांना कळवण्यात आले. डॉ. प्रियंकाने कोणतीही सुसाइड नोट लिहिलेली नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तिच्या आत्महत्येचे कारण लगेच स्पष्ट होऊ शकले नाही.

Next Article

Recommended