पुणे - सांस्कृतिक विश्वाचे प्रतिनिधित्व करणा-या संमेलनांनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. आर्थिक मदतीसाठी सतत सरकारच्या दारात त्यांनी येऊ नये, अशा शब्दांत ‘निधी वाढवून देण्याची मागणी रेटणा-या संमेलनवाल्यांना’ सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी येथे कानपिचक्या दिल्या.
आगामी नाट्यसंमेलनासाठी सरकारकडून निधी वाढवून मिळावा, अशी मागणी नाट्यसंमेलन, विश्व साहित्य संमेलन तसेच साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी लावून धरली आहे. या मागण्या फेटाळत तावडे म्हणाले, असे उपक्रम स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजेत. सरकार आधीपासूनच विविध सांस्कृतिक उपक्रमांना निधी देत आहे. सतत निधी वाढवण्याची मागणी करणे योग्य नव्हे. हे उपक्रम स्वत:च्या पायावर उभे राहावेत यासाठी सरकार नक्कीच काहीतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न करेल, असेही तावडे म्हणाले.