आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पत्नीचा, UP त सासऱ्याचा खून; आरोपीला अटक, नाल्यात फेकला होता मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कौटुंबिक वादातून भोसरीत पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने उत्तर प्रदेशात जाऊन सासऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.  आपल्या पत्नीचा खून करुन आरोपीने तिचा मृतदेह नेहरूनगर येथील एका नाल्यात फेकला होता. या आरोपीला पिंपरी पोलिसांनी सापळा रचून उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. प्रमिला विनोद जैस्वाल (रा.पिंपरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
 
याप्रकरणी विनोद मंगरूराम जैस्वाल, राजन मंगरूराम जैस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. 
पोलिस हवालदार शकिर जीनेडी यांना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी केल्यावर ही महिला बेपत्ता असल्याचे समजले. पाच दिवसांपूर्वी या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आणि तिच्या पतीनेच हा खून केल्याचे उघड झाले. घरातील सतत होणाऱ्या भांडणांना कंटाळून पतीने या महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून तिचा खून केला. पत्नीचा मृतदेह पोत्यात भरून तो त्याने भावाच्या मदतीने  नाल्यात टाकला होता. पत्नीच्या हत्येनंतर आपल्या 4 वर्षांच्या मुलाला घेऊन आरोपी उत्तर प्रदेशला रवाना झाला. मुलाला बहिणीकडे सोपवून त्याने थेट बायकोचे माहेर गाठले आणि सासरा खाजनसिंग मुन्नार गौतम (70) यांचाही खून केला.

महिलेच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पिंपरी पोलिसांनी कसून तपासाला सुरू केला होता. तेव्हा, या महिलेचा पती उत्तर प्रदेशात गेल्याची माहिती त्यांना मिळाली. तिथेच त्यांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करत त्याला अटक केली.
 
आरोपीने सांगितले  की, पत्नीशी नेहमी वाद होत होता. यासंदर्भात आझमगड न्यायालयात खटला सुरू होता. तडजोड करून तो मिटवला होता. पत्नी पुन्हा नांदायला आली होती. पिंपरीला आल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये खटके उडू लागल्याने डोक्यात लोखंड मारून तिचा खून केला.पुढील तपास पोलिस निरीक्षक मसाजी काळे करीत आहेत. या कामगिरीत पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त राम मांडुरके, पोलिस निरीक्षक विवेक मुंगळीकर, मसाजी काळे, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, अशोक निमगिरे, हरिदास बोचरे, पावन पाटील, अरुण,बुडकर, शकिर जीनेडी, प्रभाकर कणसे, गोरख थेेऊरकर, विवेक सपकाळे आदी सहभागी होते
 
 
बातम्या आणखी आहेत...