आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ.दाभोलकर हत्या प्रकरण: आर्थिक हितसंबंध दुखावलेल्यांची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अंनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी विविध शक्यता तपासून बघितल्या जात आहेत. आर्थिक हितसंबंधांची बाजू या घटनेमागे आहे काय, या दिशेने तपास सुरू आहे. दाभोलकर यांच्या प्रबोधन कार्यामुळे काही लोकांच्या आर्थिक हितसंबंधांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे अशा दुखावलेल्या व्यावसायिक संस्था, व्यक्तींची पोलिस चौकशी करत आहेत. सहपोलिस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

घटनेच्या आठवडाभरानंतरही या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलिसांनी सुमारे 1400 जणांची चौकशी केली आहे. हल्लेखोरांच्या माहितीसाठी राज्यातील कारागृहांतही तपास केला आहे. आणखी एका प्रत्यक्षदश्रीकडून माहिती घेतली जात आहे, असे सिंघल म्हणाले. तीन ते चार पथके बाहेरगावी गेली असून, परराज्यांतही शोध घेतला जात आहे. 40 ते 45 दुचाकींची पोलिसांनी तपासणी केली आहे, असे गुन्हे शाखेचे उपायुक्त राजेश बनसोडे यांनी सांगितले. 21 ऑगस्टपर्यंत शहर व जिल्हय़ात लॉजची तपासणी होणार आहे.
पोलिसांवर वाढता दबाव
या प्रकरणी तपासात ठोस असे काहीच हाती न लागल्याने पोलिसांवर दबाव वाढत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून लवकर तपासासाठी पोलिसांवर दबाव वाढत आहे. त्यातच मौल्यवान रत्ने, खडे यांचा व्यवसाय करणारे आणि भोंदू डॉक्टरांविरुद्ध दाभोलकरांनी मोहीम उघडली होती. त्यामुळे त्यांच्या आर्थिक हितसंबंधांना बाधा पोहोचली असण्याची शक्यता आहे. त्या दिशेने पोलिस तपास करत आहेत. कुटुंबीयांचा पोलिसांवर विश्वास .