आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. Narendra Dabholkar Murder Case: CCTV Footage Send To Landon For Checking

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: सीसीटीव्ही फुटेजची लंडनमध्ये तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी ओमकारेश्वर मंदिराजवळील एका सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मात्र फुटेज अस्पष्ट असल्याने प्रक्रिया करून हल्लेखोर ओळखता यावेत, यासाठी ते लंडनला पाठवण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी गुरुवारी दिली.


सोळुंके म्हणाले, मुंबई येथील एका व्यावसायिक प्रयोगशाळेकडे सदर फुटेज मंगळवारी पोलिसांनी पाठवले होते. मात्रे तेथून ते लंडनला पाठवण्यात आले आहे. घटनेतील एकमेव प्रत्यक्षदश्री साक्षीदाराने हल्लेखोरांच्या गाडीचा शेवटचा चार अंकी क्रमांक व्यवस्थित पाहिलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी आतापर्यंत 7756 या क्रमांकाच्या 105 दुचाकींची तपासणी केली असून राज्यातील सदर क्रमांकाच्या एकूण 889 दुचाकी क्रमांकाची माहिती मागितली आहे. यामध्ये गाडीचा क्रमांक, गाडी मालकाचा पत्ता, घटने दिवशी त्याचा दिनक्रम व त्याचे मोबाइल टॉवर लोकेशन तपासले जात आहे.


सनातनच्या कार्यकर्त्यास सोडले
मूळ पुण्यातील रहिवासी व सनातन संस्थेचा साधक संदीप शिंदे याला पोलिसांनी बुधवारी गोव्यातून ताब्यात घेतले होते. मात्र चौकशी करून त्याला गुरुवारी सोडून देण्यात आले. सनातन संस्थेच्या वतीने 25 जुलै रोजीच्या आझाद मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. फरासखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले की, शिंदे याचा चेहरा संशयिताच्या रेखाचित्राशी मिळताजुळता असल्याचे समजल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, त्याच्याकडील चौकशीत काहीच निष्पन्न न झाल्याने दुपारी तीन वाजता त्याला सोडण्यात आले.


आमची वैचारिक लढाई : घनवट
सनातन संस्थेचे कार्यकर्ते सुनील घनवट यांचीही चौकशी करण्यात आली. ते म्हणाले, सनातनचा या घटनेशी संबंध नाही. दाभोलकर यांच्यासोबत आमची वैचारिक लढाई होती. पोलिस विविध संघटनांची चौकशी करत असून आमच्या काही कार्यकर्त्यांना चौकशीसाठी बोलावले. आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत.