आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. Narendra Dabholkar Murder More Important Than German Bekary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास जर्मन बेकरीपेक्षाही मोठा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोटाचा सखोल तपास एटीएस व पुण्याच्या गुन्हे शाखेने केला. मात्र, डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास त्यापेक्षाही मोठा झाला असून राज्यभरातील पोलिस यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहे, अशी माहिती तपास पथकातील एका अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.


मारेक-यांचे रेखाचित्र राज्यातील सर्व पोलिस चौकीपर्यंत पाठवण्यात आले आहे. त्याच्या मदतीने सर्व जिल्ह्यातील खुनाचे, गंभीर गुन्ह्यातील आरोपी व संशयित संघटना, व्यक्ती यांच्याकडे सखोल चौकशी केली जात आहे. हे सर्व घटक खुनाच्या आदल्या दिवशी कुठे होते याचीही खातरजमा केली जात आहे. पुणे गुन्हे शाखेने सुमारे 250 पोलिसांची 23 पथके स्थापन केली असून ती राज्यभर फिरत आहे. मुंबई पोलिसांचे विशेष पथकही नेमले आहे.


बॅलेस्टिकचा अहवाल लवकरच
आरोपींनी दाभोलकरांवर पाठीमागून पाच राऊंड पिस्टलमधून फायर केले. घटनास्थळी दोन जिवंत काडतुसे व दोन पुंगळ्या सापडल्या. या गोळ्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवल्या असून त्याचा बॅलेस्टिक अहवाल लवकरच येईल, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी दिली.