आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजवादी नेत्या डॉ. सुधाताई काळदाते यांचे पुण्यात निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - समाजशास्त्राच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ समाजवादी नेत्या डॉ, सुधाताई काळदाते यांचे सोमवारी दुपारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी नेते, औरंगाबादचे माजी खासदार दिवंगत डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्या त्या पत्नी होत्या. सुधाताईंच्या पश्चात कन्या कांचन, अनुपमा आहेत. कांचन या पुणे तर अनुपमा बंगळुरूला असतात.

सुधाताईंनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार सानेगुरुजी हॉस्पिटलमध्ये देहदान करण्यात आले आहे.