आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Sushma Kothari Got Fake P.hd, Not Went To Srilanka

डॉ. सुषमा कोठारींची पीएचडी बनावट, श्रीलंकेला न जाताच पदवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - लोहिया हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करणा-या बोगस डॉक्टर सुषमा कोठारीने श्रीलंकेतील कोलंबो येथून बनावट पीएचडी (कॉस्मेटिक) पदवी घेतली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. कोठारी कधीही श्रीलंकेस गेली नसून तिने बनावट पदवी घेतल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सर्वप्रथम डॉ. सुषमा कोठारीचे प्रकरण उघडकीस आणले. कोठारीने वैद्यकीय प्रमाणपत्र कोठून मिळवले याची चौकशी करणे, मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र ताब्यात घेऊन सत्यता पडताळणे, तिने किती लोकांची तपासणी केली, तिने पुण्याबाहेर कोठे रुग्णालय उघडले का, तिला पदवी प्रमाणपत्र कोणी दिले, तिचा मुख्य सूत्रधार व साथीदार यांचा शोध घेणे यासाठी सुषमा कोठारीला 7 दिवस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. या प्रकरणात सुषमा कोठारीला मंगळवारी रात्री पोलिसांनी
अटक केली.