आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Dabholkar Murder Case: Two Suspects Arrested In Goa

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी दोन संशयितांना गोव्यात अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/पणजी - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने दोन संशयितांना शुक्रवारी फोंडा (गोवा) येथून ताब्यात घेतले. त्यांची नावे मंगेश हरभानसिंह चौधरी (30 नालासोपारा) व मुमताज ऊर्फ मुन्नाभाई रसूल अन्सारी (43, जोगेश्वरी) अशी आहेत.
दरम्यान, इचलकरंजीतील मनीष ऊर्फ मन्या नागोरीचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. नागोरीचा साता-यातील सहकारी व मनसेचा कार्यकर्ता युवराज पवार याचीही एटीएसने चौकशी सुरू केली असून त्याला सातारा पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. मनीष नागोरी व युवराज पवार हे दोघे सहकारी असून त्यांच्यावर सातारा येथे मागील वर्षी गोळीबाराचा गुन्हा दाखल आहे. नागोरीची एटीएसने कसून चौकशी केली आहे. पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नंतर त्याला पुणे विद्यापीठातील रखवालदार प्रल्हाद जोगदंडकर याच्या खुनाच्या आरोपात संशयित म्हणून ताब्यात घेत डॉ.दाभोलकर प्रकरणाचाही तपास सुरू केला आहे.

नागोरी हा शस्‍त्रास्‍त्र विक्रेता आहे. जोगदंडकर आणि डॉ. दाभोलकर यांची हत्‍या करण्‍यासाठी एकाच प्रकारचे पिस्‍तुल वापरण्‍यात आल्‍याचा अहवाल प्राप्‍त झाला आहे. त्‍यामुळे नागोरीनेच डॉ. दाभोलकर यांच्‍या मारेक-यांना पिस्‍तुल पुरविल्‍याचा संशय आहे. त्‍याच्‍याकडून आणखी माहिती प्राप्‍त होण्‍याची पोलिसांना अपेक्षा आहे. नागोरीने 47 जणांना शस्‍त्र पुरविले आहेत. त्‍यानेच दिलेल्‍या माहितीवरुन दोघांना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.