आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr.Narendra Dabholkar DVD News In Marathi, Pune, Divyamarathi, Superstition

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. नरेंद्र दाभोलकरांवरील डीव्हीडीचे 19 फेब्रुवारी रोजी पुण्यात प्रकाशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना वेळोवेळी विचारले गेलेले निवडक प्रश्न आणि त्या प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे, अशी डीव्हीडी समितीच्या वतीने 19 फेब्रुवारीला अभिनेते अमोल पालेकर व पत्रकार दिलीप पाडगावकर यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशित होणार आहे.

दोन तासांच्या या डीव्हीडीमध्ये एकूण 26 प्रश्नांची सविस्तर उत्तरे डॉ. दाभोळकरांनी दिली आहेत. त्यामध्ये र्शद्धा-अंधर्शद्धा, विज्ञान-बुवाबाजी, जादूटोणा-फलज्योतिष, भूत-भानामती, धर्म-अध्यात्म आदी विषय आहेत. हे सर्व प्रश्न महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतून विचारले गेले आहेत. 8 एप्रिल 2013 रोजी या डीव्हीडीचे चित्रीकरण करण्यात आले होते.याच डीव्हीडीमध्ये शहाजी भोसले यांनी काही चमत्कारांचे सादरीकरण केले आहे.