आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. दाभोलकरांच्या हत्येला सहा महिने पूर्ण, मारेकरी अद्याप मोकाटच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज सहा महिने पूर्ण होत आहेत. मात्र अद्याप दाभोळकरांच्या मारेक-यांना शोधण्यास पोलिस यत्रंणांना यश मिळाले नाही. त्यामुळे सामान्य जनतेत सरकारबाबत नाराजी आहे. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील बालगंधर्व नाट्यमंदिराजवळील नदीच्या पुलावर दोन अज्ञात बाईकस्वरांनी सकाळी सव्वासातच्या सुमारास गोळ्या घालून हत्या केली होती.
दरम्यान, या घटनेचा पोलिस कसून तपास करीत आहेत. पण अद्याप यश मिळाले नाही. तमाम महाराष्ट्रासाठी ही शरमेचे बाब आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. दाभोलकर यांना आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी वारकरी संघटनेच्या वतीने ज्या पुलावर दाभोलकरांची हत्या झाली त्या ओंकारेश्वर पुलावर किर्तनाच्या माध्यमांतून आदरांजली वाहण्यात आली.
दुसरीकडे, ख्यातनाम अभिनेते अमोल पालेकर यांनी दाभोलकरांचे मारेकरी जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कुटुंबियांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारू नये, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे 'प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे' नावाच्या डीव्हीडीचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी पालेकर बोलत होते.