आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. दाभोलकर हत्येचा पोलिस तपास थंडावला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सहा महिने उलटले तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकºयांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या प्रकरणात संशयावरून इचलकरंजी येथील बेकायदा शस्त्रविक्री करणारे मनीष उर्फ मन्या नागोरी व विकास खंडेलवाल यांना अटक करून पोलिसांनी दबाव कमी करण्याचा काहीसा प्रयत्न केला असला तरी अद्याप या दोघांकडून कोणतीही ठोस माहिती शकलेली नाही.
डॉ. दाभोलकरांच्या मारेकºयांचा तपास लावण्यात पोलिस अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ अंनिसतर्फे गुरुवारी राज्यभर ‘एक उपवास वेदनेचा’ हा कार्यक्रम राबवण्यात आला. डॉ. दाभोलकर यांची हत्या झालेल्या बालगंधर्व रंगमंदिर पुलावर मुंबईतील कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर व सातारा-यातील डॉ. सुहास फडतरे यांनी कीर्तनातून सरकारचा निषेध केला.
राज्यपालांना निवेदन
अंनिसचे कार्यवाह मिलिंद देशमुख म्हणाले, डॉ. दाभोलकर प्रकरणाच्या तपासाबाबत आम्ही पोलिसांशी समन्वय साधून आहोत. मात्र, तपास संथगतीने सुरू असल्याचेच सध्या समोर येत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून काही निष्पन्न झाले नसून सदर तपास बॅकफूटवर जातो आहे का? अशी आमची भावना बनत चालली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा, या मागणीचे निवेदन लवकरच राज्यपालांना देणार आहोत.