आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Dabholkar Murder Case News In Marathi, Divya Marathi, Andhshraddha Nirmulan Samiti

डॉ.दाभोलकर खून प्रकरण तपासाला गती देणार, पुणे पोलिस आयुक्त सतीश माथूर यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे प्रकरण महत्त्वाचे असल्याचे पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची आढावा बैठक बोलावत त्यांनी याबाबत आपला प्राधान्यक्रम स्पष्ट केला.


निवडणुका पार पाडण्यास प्राधान्य राहणार आहे. पोलिस दलात बहुतांश अधिकारी नव्याने रुजू झाले असून व्यवस्थेत आवश्यक ते बदल करण्यास थोडा वेळ लागेल, असेही ते या वेळी म्हणाले.सतीश माथूर हे महाराष्ट्रातील 1981 आयपीएस बॅचचे अधिकारी असून पोलिस सेवेत त्यांनी अमेरिकेतील लुसियाना येथे स्फोटक घटनांविरोधात प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांना कोल्हापूर, पनवेल, औरंगाबाद, नागपूर, पुणे या विविध शहरांत कामाचा अनुभव आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, आर्थिक गुन्हे शाखा, कारागृह महानिरीक्षक, एअर इंडिया सुरक्षा प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मुंबई पोलिस मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत असताना, त्यांची पुणे पोलिस आयुक्तपदी नेमणूक झाली आहे.