आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Amol Khole Critics On Raj Thackeray & Mns At Pune

\'9 महिन्यात तर मूल जन्मते, पण राज ठाकरेंना 7 वर्षात \'ब्ल्यू प्रिंट\' काढता येईना\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- देशात 56 टक्के युवा मतदार आहेत मात्र त्यांच्यासाठी काहीही धोरण नाही. राज्यातही तशीच स्थिती आहे. पाण्याच्या साठ्यासारख्या असलेल्या या युवकांना योग्य दिशा देण्याऐवजी त्यांना भडकविण्याचे काम काहीजण करीत असल्याचा आरोप शिवसेना नेते तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी मनसेचे नाव न घेता केला. नऊ महिन्यात मूल जन्माला येते. मात्र 'त्यांना' सात वर्षात महाराष्टाच्या विकासाची 'ब्ल्यू प्रिंट' काढता आली नाही, अशी खिल्लीही त्यांनी उडविली. ढाण्या वाघाच्या चालीने स्वतःच्या कर्तुत्वावर पुढे जाणारे नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी हवेत, असेही त्यांनी मत मांडले.
मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ चिंचवडच्या मोहननगर येथे डॉ. कोल्हे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. कोल्हे म्हणाले की, शिवजयंतीला आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून भगवा पांघरला. त्याआधी आपण कोणत्या पक्षात जाणार याविषयी अनेक वावड्या उठल्या होत्या. मात्र, संधी मिळाल्यावर लचके तोडणा-या तरसांच्या कळपात जाण्यापेक्षा ढाण्यावाघांच्या समुदायात जाणे आपण पसंत केले. राष्ट्रभक्तीकडे नेणारे हिंदुत्व, स्त्रियांची सुरक्षितता, लोकाभिमुख स्वच्छ प्रशासन, रयतेचे कल्याणकारी राज्य, व्यापक दुरदृष्टी असलेले नेतृत्व ही पंचसुत्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकविली. हाच विचार दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे नेला. त्यांनी सर्वसामान्यांना स्वाभिमाने जगायला शिकविले. शिवरायांना अभिप्रेत असणारे रयतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेस आघाडी सरकार याउलट दिशेने चालले आहे.
पुढे वाचा, अमोल कोल्हे यांनी कोणा-कोणावर हल्लाबोल...