आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: दाभोलकरांच्या हत्येचा तपास न लागल्याने नसिरूद्दीन शहा उतरले रस्त्यावर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले. हत्येला वर्ष झाले तरी सर्वच तपास यत्रंणांचे हात रिकामेच आहेत. दरम्यान, आज अंनिसतर्फे पुण्यासह राज्यभर निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ज्या ठिकाणी दाभोलकर यांची हत्या करण्यात आली त्या ओंकारेश्वर पुलावर जाऊन आज सकाळी आदरांजली वाहण्यात आली. तसेच एक वर्ष होऊनही हत्येचा तपास न लागल्याने अंनिसच्या कार्यकर्त्यांनी समूहगायन सादर केले. यानंतर निषेध दिन जागरण कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते नसिरूद्दीन शाह, अमोल पालेकर, दिग्दर्शक अतुल पेठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दाभोलकर यांची कन्या मुक्ता, मुलगा हमीद व पत्नी शैला यांनीही सहभाग घेतला.
दाभोलकर यांच्या साता-यातही मानवी साखळी काढत दाभोलकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. याचबरोबर वर्षभरात हत्येचा तपास न झाल्याने अनेक विवेकवादी विचाराच्या मंडळींनी नाराजी व्यक्त केली. लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद आदी शहरातही दाभोलकरांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे यांनी डॉ. दाभोलकरांना रिंगण नाट्याद्वारे आदरांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी दुपारी दोन वाजता पुण्यातील मनोहर मंगल कार्यालयात आपल्या नाट्याचा 100 वा प्रयोग आयोजित केला होता.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निर्मित आणि महाराष्ट्र अंनिस लोक-रंगमंच प्रस्तुत रिंगण नाट्य या नाटकाच्या प्रयोगात 20 गावांतील 250 कलाकार-कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पथनाट्य प्रकारातील हे नाटक दुपारी दोन ते रात्री आठ असे सहा तास चालेल. या नाट्यातून दाभोलकरांचे विचार, अंधश्रद्धा निर्मूलनाकरिता जनजागृती करण्याचा प्रयत्न करतील.
निषेध रॅलीचे आणखी फोटो पुढे पाहा...