आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंजण्यापेक्षा झिजणे अधिक आनंददायी- डॉ. विश्वनाथ कराड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ''एका जागी बसून गंजण्यापेक्षा समाजासाठी कार्य करीत झिजणे अधिक आनंददायी आहे. त्यामुळे भविष्यातही जिद्दीने कामकरीत राहणार आहे. हे काम एकट्या दुकट्याचे नसून, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा त्यासाठी मला उर्जा देतील आणि माझ्या हातून सत्कार्य घडेल,'' अशी कृतज्ञापूर्वक भावना विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केली.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहातील संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि समाजातील प्रतिष्ठित मंडळींतर्फे प्रा. कराड यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हृद्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रसंगी पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. उज्ज्वल निकम, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, उद्योजक अरुण फिरोदिया, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, श्रीकृष्ण कर्वे गुरुजी, ह. भ. प. धनवटे महाराज, माईरचे अध्यक्ष डॉ. सुरेश घैसास, माईरचे सचिव डॉ. चंद्रकांत पांडव, माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे पाटील, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर व स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक डी. पी. आपटे उपस्थित होते.
प्रा. कराड म्हणाले, ''आज पंचाहत्तरीत पदार्पण केल्यानंतर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारताना आनंद होण्याबरोबरच काहीसा भावनिकही झालो आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा पाठिशी असल्यानेच एमआयटीसारखी संस्था उभी राहिली आहे. तरुणांमध्ये भारतीय अस्मिता जागविण्याचा सतत प्रयत्न केला आहे. धार्मिक वृत्तीचा आणि अंधश्रद्धा जोपासणारा देश अशी भारताची प्रतिमा पाश्‍चिमात्य देशांनी केल्याची खंत मनात आहे. ही प्रतिमा बदलण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माचा संगमकरण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रतिभावान युवक घडविणार्‍या एमआयटीला 'मॅग्निफिशंट इन्स्टिट्यूट ऑफ टॅलेंट' अशी ओळख निर्माण करायची आहे.''
आपल्या यशात नेहमी ईश्‍वर आणि कुटुंबीयांचा मोठा वाटा असल्याचे सांगत प्रा. कराड म्हणाले, ''वडिल भगिनी प्रयागअक्कांनी मला जगण्याची प्रेरणा दिली. अध्यात्माचा खरा अर्थ समजून सांगितला. दुसर्‍यासाठी कायमझीजत राहाण्याची शिकवण मोठ्या भावाने दिली. त्यातूनच प्रेरणा घेत वैज्ञानिक सत्य सांगणार्‍या भगवद्गीतेचा प्रसार करीत आहे. जगात सुख, शांती नांदावयाची असेल, तर आपल्याला विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालावी लागेल, तसेच सर्व धर्मग्रंथांना जीवनग्रंथ समजून जीवन जगायला हवे.''
पुढे वाचा, डॉ. विश्वनाथ कराड यांच्याविषयी मान्यवरांनी काय भावना व्यक्त केल्या...