आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: सीबीआयकडून वर्षभरानंतर नव्याने दोन रेखाचित्रे जारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: सीबीआयने नव्याने जारी केलेली स्केचेस...) - Divya Marathi
(छायाचित्र: सीबीआयने नव्याने जारी केलेली स्केचेस...)
पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांची रेखाचित्रे (स्केचेस) सीबीआयने तयार केली आहेत. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या सांगण्यावरून तयार करण्यात आलेल्या रेखाचित्रांवरून सीबीआय मारेक-यांचा युद्धपातळीवर शोध घेत असल्याची माहिती सीबीआय सूत्रांकडून मिळाली आहे. पुणे पोलिसांनी सादर केलेल्या रेखाचित्रांपेक्षा ही रेखाचित्रे अधिक स्पष्ट असून याद्वारे मारेक-यांपर्यंत पोहचता येईल असे सीबीआयचे म्हणणे आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात यावे असा आदेश मुंबई हायकोर्टाने 9 मे 2014 रोजी दिला होता. त्यानंतर सीबीआयने तपासाला सुरुवात केली. मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी 20 ऑगस्ट 2013 रोजी 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी दाभोलकर यांची ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याचदिवशी या प्रकरणाचा तपास पुण्याच्या गुन्हे शाखेकडे सोपविला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तब्बल 22 हून अधिक पथकांची स्थापना करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी रात्रंदिवस एक करूनही या प्रकरणाचा तपास केला मात्र यश आले नाही. अखेर मे 2014 मध्ये हा तपास पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग झाला होता. तेव्हापासून सीबीआय या प्रकरणाचा तपास करीत आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या सांगण्यावरून दोघा मारेक-यांची रेखाचित्रे तयार केली आणि त्याद्वारे तपास सुरू केला. राज्यभरातील साईत गुन्हेगार, शॉर्प शूटर, सुपारी किलर तसेच कारागृहात असलेल्या कैद्यांकडे चौकशी करण्यात आली होती. पुणे शहरातील 185 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. याचबरोबर एक हजारांहून अधिक दुचाकीची तपासणी केली. हत्येला आठ महिने उलठल्यानंतर पुणे पोलिसांना कोणतेही धागेदोरे न मिळाल्याने पोलिस महासंचालकांनी प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना केली. एसआयटीची स्थापना झाल्यानंतरही या प्रकरणाचा छडा लागत नव्हता.
अखेर या प्रकरणी याचिका दाखल झाल्यानंतर मुंबई हायकोर्टाने सीबीआयकडे तपास देण्याचा आदेश दिला. जून 2014 पासून सीबीआय तपास करीत आहे. अखेर सीबीआयने प्रत्यक्ष साक्षीदारांच्या सांगण्यावरून संशयित मारेक-यांची रेखाचित्रे तयार केली आहेत. दाभोलकरांच्या मारेक-यांची माहिती देण्यास राज्य सरकार व पुणे पोलिसांनी 11 लाखांचे बक्षीस यापूर्वीच जाहीर केले आहे.