आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात मोदींनी लक्ष द्यावे; अंनिसची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येचा तपास सीबीअायकडे जाऊनही अद्याप काेणतीही ठाेस महिती मिळाली नाही. या हत्येचा तपास वेगाने हाेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंनिस पदाधिकाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी भेट घालून द्यावी, अशी मागणी अंनिसतर्फे करण्यात अाली अाहे.

डाॅ.दाभाेलकर यांच्या हत्येला २२ महिन्यांचा कालावधी उलटूनही मारेकरी सापडलेले नाहीत. तसेच काेल्हापूर येथील काॅ. गाेविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाताही प्रगती हाेत नसल्याने अंनिसतर्फे शनिवारी महर्षी वि.रा.शिंदे पुलावर अांदाेलन करण्यात अाले. या वेळी माजी गृहराज्यमंत्री व समाजवादी नेते डाॅ.भाई वैद्य, मुक्ता मनाेहर, डाॅ.हमीद दाभाेलकर, िमलिंद देशमुख, विनिता देशमुख, शांताबार्इ रानडे यांच्यासह अंनिस कार्यकर्ते माेठया संख्येने उपस्थित हाेते. अांदाेलनानंतर मुक्ता मनाेहर लिखित ‘समतेचे वारकरी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात अाले.

डाॅ.हमीद म्हणाले, डाॅ.दाभाेलकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीअायकडे जाऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटला, मात्र तपासाबाबत विशेष काेणतीही प्रगती नाही. तसेच तपासाच्या प्रगतीबाबत काेणतीही व्यवस्थित माहिती सीबीअायचे अधिकारी अाम्हास देत नाही. डाॅ.दाभाेलकर व डाॅ.पानसरे यांचे हत्या प्रकरणात केवळ संशयित मारेकऱ्यांचे फाेटाे प्रसिध्द करण्यात अाले. मात्र, तपासाबाबत काेणतीही प्रगती झालेली नाही. सरकारकडून जास्त अपेक्षा धरता येणार नसल्याचे या वेळी भाई वैद्य यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...