आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Raosaheb Kasabe On Maharashtra Sahitya Parishad President

मसापच्या अध्यक्षपदी डॉ. रावसाहेब कसबे तर पवार, गडाख विश्वस्तपदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत राबसाहेब कसबे यांची रविवारी एकमताने निवड करण्यात आली. डॉ. शिवाजीराव कदम, उल्हास पवार यशवंतराव गडाख यांची विश्वस्तपदी निवड झाली.

नवनिर्वाचित कार्यकारिणीची पहिली बैठक रविवारी झाली. त्यात उपाध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर, निर्मला ठोकळ आणि चंद्रकांत शेवाळे यांची निवड झाली. मसाप पत्रिकेच्या संपादकपदी डॉ. पुरुषोत्तम काळे यांची, तर सहायक संपादकपदी सुरेश देशपांडे यांची निवड झाली. साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय एप्रिल महिन्यापासून विदर्भ साहित्य संघाकडे गेले आहे. चार घटक संस्थांचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी महामंडळावर पाठवले जातात. मसापतर्फे हे प्रतिनिधित्व प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे रवींद्र बेडकीहाळ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मसाप विभागीय साहित्य संमेलनाचे निमंत्रकपद पद्माकर कुलकर्णी यांना देण्यात आले आहे. पुण्याबाहेरचे कार्यवाह म्हणून जळगाव येथील प्रा. तानसेन जगताप विनोद कुलकर्णी असतील, तर डॉ. अरुणा ढेरे यांची मसापच्या संशोधन विभागप्रमुखपदी निवड करण्यात अाली.