आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Narendra Dabholkar Family Angry On Maharashtra Police

दाभोलकरांचे मारेकरी पकडायचेत की नाही? कुटुंबीयांची संतप्त भावना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘डाॅ .नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येस ३२ महिन्यांचा तर कॉ. गाेविंद पानसरे यांच्या हत्येस १६ महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, अजूनही तपासात काेणतीही प्रगती दिसत नाही. डॉ. दाभोलकरांचे मारेकरी सरकारला खरेच पकडायचे अाहेत का नाही?, नाहीतर त्यांनी तपासात अपयशी ठरल्याचे जाहीर करावे’, अशी संतप्त प्रतिक्रिया डाॅ. शैला नरेंद्र दाभाेलकर व उमा गाेविंद पानसरे यांनी गुरुवारी व्यक्त केली.

शैला म्हणाल्या, डाॅ.दाभाेलकर यांच्या हत्येच्या तपासात सुरुवातीच्या काळात अक्षम्य चुका झाल्या. पाेलिसांनी केलेल्या चुकाच सीबीअायही करत अाहे. सीबीअायला पुरेसे मनुष्यबळ देण्यात येत नाही. डाॅ. दाभाेलकर, पानसरे व कलबुर्गी या विवेकवादी विचारवंतांचा खून करण्यात आला असून यामागे धर्मांध लोक आहेत. त्यांना वेळीच अावर घातला नाही तर बांगलादेशसारखी वेळ येणे दूर नाही. अंनिस अाणि समविचारी लाेकांचे एक शिष्टमंडळ लवकरच राष्ट्रपतींना भेटून अापले म्हणणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अाराेप निश्चिती तूर्त नकाे
डाॅ. मेघा पानसरे म्हणाल्या, पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाडच्या अटकेनंतर तपास पूर्णपणे थंडावला अाहे. या प्रकरणातील तपास अधिकारी अनेकवेळा बदलण्यात अाले. हत्येचा तपास करणाऱ्या एसअायटीमध्ये कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. एसअायटीचे प्रमुख संजय कुमार यांच्याकडे संपूर्ण राज्याच्या सीअायडी विभागाची जबाबदारी असून त्यांना पानसरे खटल्यात लक्ष देण्यास वेळ नाही. गायकवाडविषयी महत्त्वाचे पुरावे असूनदेखील तपासात प्रगती नाही. त्यामुळे तपास अर्धवट असताना गायकवाडवर अाराेप िनश्चिती करून खटला सुरू हाेण्याची शक्यता अाहे. सरकारच्या ढिसाळपणामुळे या कटातील संशयित अाराेपी माेकळा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तपास पूर्ण करूनच त्याच्यावर अाराेप निश्चिती करण्यात यावी. उच्च न्यायालयाने तीन मेपर्यंत तपासातील प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे अादेश सीबीअाय अाणि एसअायटीला दिल्याचे त्यांनी सांगितले.