आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताराच्या विनयवर संशय; तावडेच्या सीबीआय कोठडीत 20 जूनपर्यंत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- डॉ.नरेंद्र दाभाेलकर हत्याप्रकरणी सीबीआयने सनातनचा साधक डाॅ. वीरेंद्र तावडे याच्याविरुद्ध चौकशीचा फास आवळल्यानंतर या प्रकरणी नवीन माहिती हाती येत आहे. त्यानुसार, डाॅ. दाभाेलकरांच्या हत्येपूर्वी तीन महिने तावडेला एका अज्ञात व्यक्तीने ईमेल पाठवून डाॅ.दाभाेलकरांवर लक्ष्य केंद्रित करण्यास सांगितले होते. ही माहिती सीबीअायने गुरुवारी न्यायमूर्ती व्ही.बी.गुळवे पाटील यांच्या न्यायालयात दिली. दरम्यान, सीबीआयने न्यायालयात सहा संशयितांची नावे सादर केली असून यात सातारा जिल्ह्यातील विनय पवार हे नवीन नाव समोर आले आहे. दरम्यान, तावडेच्या पोलिस काेठडीत २० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
दाभाेलकर हत्येपूर्वी अालेल्या ई-मेलला तावडने उत्तर देता थेट अंमलबजावणी केली. हा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीबाबत तपास करावयाचा अाहे. दाभाेलकर हत्या प्रकरणात एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाला असून त्याने दुचाकीवरून अालेल्या दाेन मारेकऱ्यांना पाहिले. त्यापैकी एकाचे सारंग अकाेलकरशी साधर्म्य असल्याचा दावा सीबीअायने केला.
विनय पवार हा कराड परिसरातील उंब्रजचा रहिवासी आहे. तोही सनातनचा साधक असून मडगाव स्फाेटावेळी आरोपींना अाश्रय देण्याचे काम तो करत होता. दाभाेलकर, पानसरे वकलबुर्गी या तिन्ही हत्यांच्या वेळी पवार सक्रिय होता, असे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
पानसरे हत्येवेळी तावडे होता कोल्हापुरात?
डाॅ.तावडेने २००१मध्ये डाॅक्टरकी सोडून पूर्णवेळ सनातन साधक म्हणून काम सुरू केले. ताे पत्नीपासून विभक्त राहतो. पानसरंेच्या यांच्या हत्येवेळी तो कोल्हापुरातच होता, असे सूत्रांनी सांगितले. एसआयटीनेही तावडेचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)