आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर हत्येत पुण्यातील पोलिसाचा सहभाग, गोळ्या दिल्याचा संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात पुणे पोलिस दलात कार्यरत असलेला एक अधिकारी सामील असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सीबीआयच्या अटकेत असलेला वीरेंद्र तावडेला या पोलिस अधिक-यानेच नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी शस्त्र पुरविल्याचे तपासात पुढे येत आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने सनातनचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे याच्याविरुद्ध चौकशीचा फास आवळल्यानंतर या प्रकरणी नवीन माहिती तपास पथकाच्या हाती येत आहे. त्यानुसार, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी तीन महिने तावडे यास एका अज्ञात व्यक्तीने ईमेल पाठवून डॉ. दाभोलकर यांच्यावर लक्ष्य केंद्रित करण्यास सांगितले होते. त्याआधी 2009 मध्ये दाभोलकरांच्या हत्येचा कट शिजला होता. परंतु गोव्यातील बॉम्बस्फोट प्रकरणामुळे हा हत्येचा कट चार वर्षे लांबला. वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर यांना पुणे पोलिस दलातील संबंधित अधिका-यानेच शस्त्र पुरविल्याचे पुढे येत आहे. सीबीआयकडून संबंधित अधिकारी आणि तावडे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्डस तपासले जात आहेत. तसेच सीबीआय त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याबरोबरच पुढील तपासात आणखी खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
दाभोलकरांना मारण्यासाठी एप्रिल 2013 मध्ये शस्त्रे गोळा केली-
वीरेंद्र तावडे याच्याकडे सापडलेल्या मेलमध्ये सांकेतिक शब्दांचा वापर असून त्यात बंदुकीच्या गोळीला 'चॉकलेट', हिंदूविरोधी लोकांना 'दानव', 'राक्षस' असे संबोधण्यात आले आहे. दाभोलकरांना मारण्यासाठी शस्त्र मिळवण्यासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसामसह कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली आदी भागात प्रयत्न केले. मात्र, त्यांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, पुण्यातील एका पोलिस अधिका-याकडून त्यांनी गोळ्या मिळविल्याचे तपासात पुढे येत आहे. डॉ. दाभोलकर हत्येत वापरण्यात आलेली शस्त्रे एप्रिल 2013 मध्ये आरोपींकडे आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
पानसरे हत्येचाही तावडे सूत्रधार?-
डॉ. तावडे याने 2001 मध्ये डॉक्टरकी सोडून पूर्णवेळ सनातन साधक म्हणून काम सुरू केले. तो पत्नीपासून विभक्त राहतो. दाभोलकरांचा खून पचवल्यानंतर तो पुढच्या कामाला लागला असण्याची शक्यता आहे. पानसरे हत्येपूर्वी 2014 आणि 2015 तसेच त्यानंतरही तावडेचे कोल्हापुरात येणे- जाणे सुरु होते असे तपासात पुढे येत आहे. त्यामुळे पानसरे हत्येतही तावडेचा सहभाग असू शकतो असा संशय आहे. त्यामुळेच पानसरे हत्याकांडाचा तपास करणा-या एसआयटी पथकाने तावडेचा ताबा मिळवण्यासाठी पुणे कोर्टात अर्ज दाखल केला आहे.
पुढे वाचा, सनातन संस्थचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले, साक्षीदार बोगस, सीबीआयने त्याला खरेदी केले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)