आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भारतीय लोकसंस्कृती, दैवतशास्त्र, प्राच्यविद्या यांचे गाढे अभ्यासक, संशोधक, साहित्यिक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे (८७) यांचे शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या, एक मुलगा असा परिवार आहे.

प्रसिद्ध लेखिका-कवयित्री डॉ. अरुणा ढेरे त्यांच्या ज्येष्ठ कन्या होत. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमारे ६५ वर्षे ढेरे त्यांनी संशोधन-लेखन केले. त्यांनी स्वत:च्या संशोधनासाठी जमवलेला ४० हजार ग्रंथांचा संग्रह तरुण संशोधकांसाठी खुला केला होता.
दरवर्षी वाढदिवशी ते संशोधनाचा नवा संकल्प करत. एवढेच नव्हे, तर वर्षभरात तो विषय लेखनातून मांडत. कुटुंबीय परिचितांमध्ये डॉ. ढेरे अण्णा या नावाने प्रसिद्ध होते. विशेषपान.
बातम्या आणखी आहेत...