Home »Maharashtra »Pune» Dr. Vinay Sahastrabuddhe Comment On Maharahstra Politics At Pune

देशातील राजकीय विचारधारेची ढोंगी डाव्यांमुळे हानी : सहस्त्रबुद्धे

‘असहिष्णुतेची भाषा करणाऱ्या डाव्यांच्या वैचारिक असहिष्णुतेची असंख्य उदाहरणे आहेत. आर्थिक भ्रष्टाचार, सर्व प्रकारचा हिंसाचार आणि वैचारिक अस्पृश्यता बाळगणाऱ्या डाव्यांमुळे देशातल्या विचाराधारित राजकीय पक्षांची हानी झाली,’ असे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

विशेष प्रतिनिधी | Aug 13, 2016, 06:04 AM IST

  • देशातील राजकीय विचारधारेची ढोंगी डाव्यांमुळे हानी : सहस्त्रबुद्धे
पुणे- ‘असहिष्णुतेची भाषा करणाऱ्या डाव्यांच्या वैचारिक असहिष्णुतेची असंख्य उदाहरणे आहेत. आर्थिक भ्रष्टाचार, सर्व प्रकारचा हिंसाचार आणि वैचारिक अस्पृश्यता बाळगणाऱ्या डाव्यांमुळे देशातल्या विचाराधारित राजकीय पक्षांची हानी झाली,’ असे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

डाव्या साम्यवादी विचारांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मोजक्या ध्येयवादी डाव्यांची जागा आता बहुसंख्य ढोंगींनी घेतली आहे. यामुळे डाव्या चळवळीचीच बदनामी सुरू झाली, असे सहस्रबुद्धे म्हणाले.

भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी लिखित ‘डाव्यांची ढोंगबाजी’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी पुण्यात झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून डाॅ. सहस्रबुद्धे बोलत होते. बंगळुरूचे प्रसिद्ध ब्लॉगर संदीप बालकृष्णन, शेफाली वैद्य या वेळी उपस्थित होते.

‘मतभेद असतील तरच लोकशाहीला अर्थ लावणाऱ्यांचा समूह देशात असल्याचे नरहर कुरुंदकर यांनी लिहून ठेवले आहे. डाव्यांनी हे समीकरण रुढ केले. लोकशाहीमध्ये मतैक्यालाही जागा असते हे त्यांना मान्यच नाही. त्यामुळे संघर्षाची, बंडखोरीची भाषा त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला. डाव्यांच्या ढोंगबाजीची अनेक रूपे १९७० नंतर उघड होत गेली. चटकन निष्कर्ष काढायचे, शेरेबाजी करायची आणि टोकाची वैचारिक अस्पृश्यता पाळत इतरांना कमी लेखायचे हे डाव्यांचे वैशिष्ट्य राहिले आहे,’ असे सहस्रबुद्धे म्हणाले. भंडारी म्हणाले, ‘डाव्यांच्या विचारांबद्दल हे पुस्तक नसून आचारांबद्दल आहे. डावे इतरांवर टीका करतात, पण त्यांच्याबद्दल बोललेले त्यांना आवडत नाही. रशियामधल्या साम्यक्रांतीला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने डाव्यांच्या आर्थिक बौद्धिक अप्रामाणिकपणाची चर्चा व्हायला हवी.’

Next Article

Recommended