आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सोवळे\' मोडल्याची मेधा खोलेंची तक्रार, गुन्हा मागे घेत वाद समोपचाराने मिटवा- ब्राम्हण महासंघ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रातिनिधिक फोटो... - Divya Marathi
प्रातिनिधिक फोटो...
पुणे- आपण ब्राह्मण तसेच सुवासिनी असल्याचे खोटे सांगून एका ब्राह्मण कुटुंबात सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यातील एका महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. असा गुन्हा दाखल करता येतो का चाचपणी करत पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. मात्र, फिर्यादी गुन्हा दाखल करण्यावर ठाम राहिल्याने पोलिसांनी नमते घेत अखेर त्या महिलेवर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. हवामान विभागाच्या माजी संचालिका व वैज्ञानिका डॉ. मेधा खोले यांनी याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. खोले या दरवर्षी आपल्या घरी गौरी-गणपती बसवितात. तसेच आई-वडिलांचे श्राद्धही घालतात. त्यासाठी त्यांना सोवळ्यातच स्वयंपाक करणारी महिला हवी होती. मे 2016 मध्ये त्यांच्याकडे एक महिला काम करण्यास तयार झाली. तसेच तिने आपले नाव निर्मला कुलकर्णी असल्याचे सांगत आपण ब्राम्हण व सुवासिनी असल्याचे सांगितले. आपण सोवळ्यात स्वयंपाक करतो असेही त्या महिलेने सांगितले. 
 
संबंधित महिलेने सांगितलेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी खोले त्या संबंधित महिलेच्या घरी गेल्या. तेथेही त्यांनी आपण ब्राह्मणच असल्याचे सांगितले. यानंतर खोले यांनी त्या महिलेला गेल्या सव्वा वर्षापासून कामावर ठेवले होते. या काळात सप्टेंबर 2016 मध्ये गौरी-गणपती तसेच खोलेंच्या वडिलांच्या श्राद्धाचा सोवळ्यात स्वयंपाक केला. 
 
नुकताच झालेला गौरी-गणपतीच्या काळातही त्या महिलेने स्वयंपाक केला. मात्र, यावेळी पूजा करण्यासाठी खोलेंकडे आलेल्या ब्राह्मण गुरूजीने संबंधित महिला ब्राह्मण नसल्याचे सांगितले. त्यामुळे खोलेंनी संबंधित महिलेच्या घरी धाव घेतली. त्यावेळी त्या महिलेने आपले नाव निर्मला यादव असल्याचे सांगितले. अधिक विचारणा केली असता निर्मलाने शिवीगाळ केल्याची व अंगावर धावून आल्याची फिर्याद डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दिली आहे. 
 
डॉ. मेधा खोले यांनी दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा-  ब्राम्हण महासंघ
 
सोवळ्याचा संबध शुचिर्भूतता आणि स्वच्छता याच्याशी त्याचा जातीशी काहीही संबंध नाही
ब्राह्मण महिला असल्याचा बनाव करून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका महिलेवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ मेधा खोले यांनी दाखल केलेला गुन्हा मागे घेवून हे प्रकरण सामोचाराने मिटवावे अशी भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली आहे. 
 
ब्राह्मण आणि सवाष्ण असल्याचे खोटे सांगून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका महिलेवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अशा विचित्र प्रकारात गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी त्यांच्या मतावर ठाम राहिल्या.
 
"सोवळ्याचा संबध शुचिर्भूतता आणि स्वच्छता याच्याशी असून त्याचा जातीशी काहीही संबंध नाही; तसेच फसवणुकीचा जो गुन्हा वयोवृद्ध महिलेविरोधात दाखल करण्यात आला त्यांच्या वयाचा विचार करता खोले यांनी तक्रार मागे घ्यावी आणि हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे ही आमची भूमिका असल्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.
 
पुढे वाचा, मेधा खोले यांनी पोलिसांत दिलेली तक्रार..... अखेरच्या स्लाईडवर वाचा तक्रारीची प्रत जशीच्या तशी....
बातम्या आणखी आहेत...