आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलामांनी बालपणी पाहिलेले स्‍वप्‍न पुण्‍यात साकार झाले होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लढाऊ विमानात असलेले कलाम. - Divya Marathi
लढाऊ विमानात असलेले कलाम.
पुणे - 'मिसाइल मॅन' भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम आता आपल्‍यात नाहीत. पण, पुणे शहरासोबत त्‍यांचे ऋणानुबंद जुळलेले होते. त्‍यामुळे ते कायम आठवणीत राहणार आहेत. राष्‍ट्रपती असताना त्‍यांनी वयाच्‍या 74 व्‍या वर्षी लढाऊ विमानाने पुण्‍यातच उड्डाण केली होती. आपण वायूदलात जावे, असे त्‍यांचे लहानपणापासूनचे स्‍वप्‍न होते. ते त्‍या निमित्‍ताने साकार झाले. अशा प्रकारे उड्डाण भरणारे ते पहिले राष्‍ट्रपती होते. पुण्‍यातील त्‍यांची ही खास आठवण. ती केवळ Divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
30 मिनिटांपर्यंत केली उड्डाण
पुण्‍यातील लोहेगाव येथे असलेल्‍या वायुसेनेच्‍या विशेष विमानतळावरून 8 जून 2006 ला डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतीय वायुसेनामध्‍ये असलेल्‍या सुपरसोनिक लढाऊ विमान सुखोई-30 एमकेआयमधून तब्‍बल 30 मिनिटापर्यंत उड्डाण केली. रशिया निर्मित हे विमान भारताचे सर्वात प्रगत लढाऊ विमान आहे. त्‍याची तुलना अमरिकेच्‍या एफ-16 विमानासोबत केली जाते. आवाजापेक्षा त्‍याची अधिक गती आहे. यातून वयाच्‍या 74 व्‍या वर्षी कलाम यांनी उड्डाण भरली होती.
पहिल्‍या उड्डाणीनंतर कलाम यांचे विचार
सुखोईमध्‍ये उड्डाण केल्‍यानंतर डॉ. कलाम म्‍हणाले होते, "मी तळागाळातील माणूस आहे. लहानपणी पाहिलेले स्‍वप्‍न आज पूर्ण झाले. विमान कधी उजव्‍या तर कधी डाव्‍या बाजूने जात होते. कधी वर तर कधी खाली येत होते. आकाशातून सर्वच खूप सुंदर दिसत होते." कलाम हे 'को पायलट' विंग कमांडर अजय राठोर यांच्‍यासोबत विमानात होते. उड्डाणापूर्वी कलाम यांना ट्रेनिंगसुद्धा दिले गेले होते.
पायलट म्‍हणाला, माझ्यासाठी गौरवाची बाब
सुखोईचे पायलट विंग कमांडर अजय राठोर यांनी डॉ. कलाम यांच्‍या संबंधी सांगितले, " मी राष्‍ट्रपतीसोबत उड्डाण केली ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. त्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता पत्रकार विमानतळावर आले होते. काहीच वेळात डॉ. कलाम पायलटच्‍या यूनिफार्ममध्‍ये विमानतळावर दाखल झाले होते. त्‍यांच्‍या चेह-यावरून आत्मविश्वास, उत्साह झळकत होता. आपल्‍या लहानपणाचे स्‍वप्‍न पूर्ण होणार याचा आनंद त्‍यांच्‍या डोळ्यांत होता. सकाळी 10.25 वाजता कलाम सुखोईमध्‍ये बसले होते. विमानतळावर उपस्थित असलेल्‍यांना स्मित देत त्‍यांनी हात दाखवला होता’’, अशी आठवण राठोड यांनी सांगितली.
पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटो...