आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. सप्तर्षी दांपत्याला ‘महापालक’ सन्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सर फाउंडेशनतर्फे पालक दिनाचे औचित्य साधून असामान्य कर्तृत्वाच्या दांपत्याला देण्यात येणारा यंदाचा महापालक सन्मान डॉ. कुमार सप्तर्षी व डॉ. ऊर्मिला सप्तर्षी यांना प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह व एक लाख रुपये असे पुरस्कारचे स्वरूप असून हा सन्मान 27 जुलै रोजी पुण्यात प्रदान करण्यात येईल, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश बुटले यांनी दिली.

बुटले म्हणाले, मागील वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांना प्रदान करण्यात आला होता. यंदा त्यांच्या सूचनेनुसारच डॉ. सप्तर्षी दांपत्याला या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. डॉ. सप्तर्षी हे युक्रांदचे संस्थापक असून ‘सत्याग्रही विचारधारा’ या माध्यमातून त्यांनी समाजालाच आपले कुटुंब मानले आहे. आजपर्यंत अनेक तरुणांचे पालकत्व उभयतांनी स्वीकारून सर्मथपणे निभावलेले आहे.