आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेपर्डी घटना वासनेतून; जातीयवादातून नव्हेच, ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांचे परखड मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘काेपर्डीतील अत्याचाराची घटना वासनांध अाणि पुरुषप्रधान जाणिवेतून घडली हाेती. त्यात जातीयवाद नव्हता. मात्र, दुर्दैवाने काेपर्डीतील घटना हे मराठा माेर्चाचे प्रेरणास्थान बनले. प्रत्यक्षात नगर िजल्ह्यातील खर्डा, नेवासा अादी ठिकाणी दलितांवर अत्याचार झाले. त्यावेळी अहमदनगर हा दलित अत्याचारग्रस्त िजल्हा जाहीर करा, अशीही राजकीय मागणी हाेत हाेती. मात्र, या मागणीला अामचा विराेध हाेता. अाज प्रत्येकाची नैतिकता, नीतिमत्ता ही प्रत्येकाच्या जातीपुरतीच मर्यादित झाली अाहे, हे भीषण वास्तव अापल्याला अराजकतेकडे नेणार अाहे,’ असे मत महात्मा गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डाॅ.कुमार सप्तर्षी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
डाॅ.सप्तर्षी म्हणाले, मराठवाड्यात नामांतराच्या लढ्यात अॅट्राॅसिटीच्या सुमारे सात हजार तक्रारी नाेंदविण्यात अाल्या, प्रत्यक्षात मात्र एकावरही कारवाई झाली नाही. कायद्यात काही पळवाटा ठेवण्यात अाल्या असून त्याचाही अापल्याकडे लाभ घेतला जाताे. खैरलांजीत जळजळीत वास्तव समाेर असतानाही प्रत्यक्षात काहीच कारवाई झाली नाही. खैरलांजीत सामाजिक प्रतिष्ठेपायी मुलीस अात्महत्येस प्रवृत्त करण्यात अाले हे अात्मघातिक कृत्य नाही का? दुसऱ्या समाजातील मुलींवर बलात्कार हाेताना काही बाेलले जात नाही.
राज्यात लाखाेंच्या संख्येने निघणाऱ्या माेर्चाचे मला िवशेष वाटत नाही. कारण सर्वात जास्त संख्या त्यांचीच असून संख्येच्या अाधारावर दहशत बसविण्याचे काम केले जात अाहे, असे मतही त्यांनी नाेंदवले.

सवर्णांना अारक्षण नकाे
डाॅ. सप्तर्षी म्हणाले, ‘महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते इतकी वर्षे सत्तेत राहून माेठे झाले, मात्र अापल्यासाेबत समाजातील इतरांना माेठे करण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. दलित, ब्राह्मण, इतर मागासवर्गीयांनी त्यांचे हात कधी बांधले नव्हते. मराठ्यांची अारक्षणाची मागणी अयाेग्य असून ब्राह्मण, व्यापारी, क्षत्रीय या सवर्णांनाही अारक्षणाची गरज नाही. गुणवत्तेला महत्त्व िदले नाही तर देश चालणार नाही त्यामुळे ५० टक्के तरी गुणवत्तेचा निकष असणे वास्तव अाहे.
मराठा हा जातींचा संघ असून त्यात ३७ जाती अाहेत. सदर जातींना वर्गात रूपांतर करण्यासाठी सर्वेक्षण करावे लागेल. अापली मने जातीबद्ध अाणि विशिष्ट विचारापुरती मर्यादित झाल्याने अापणास बधिरता अाली असल्याचे मतही सप्तर्षींनी व्यक्त केले.

गांधी सप्ताहनिमित्त कार्यक्रमांचे अायाेजन
महाराष्ट्र गांधी स्मारक िनधीतर्फे १ ते ७ अाॅक्टाेबर दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे पुण्यात अायाेजन करण्यात अाले अाहे. सदर सप्ताहाचे उद्घाटन िदल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा.डाॅ.मिलिंद अाव्हाड यांचे हस्ते हाेणार असून समाराेप स्वामी अग्निवेश यांच्या उपस्थितीत हाेणार अाहे. या दरम्यानच्या काळात शंाती मार्च, शहनार्इवादन, पखवाज अाणि सतार जुगलबंदी, मुलांच्या समस्या अाणि पालकांसमाेरील अाव्हाने विषयावर व्याख्यान, जात-अारक्षण-अॅट्राॅसिटी विषयावर परिसंवाद अादी कार्यक्रमांचे िनयाेजन करण्यात अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...