आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drama Artists Not Present At Drama Sammelan In Pandharpur

पंढरपूरमध्‍ये होत असलेल्या नाट्यसंमेलनाला रंगकर्मींची दांडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नाट्यसंमेलन रंगकर्मींची पंढरी असते, हे वाक्य बोलण्यापुरते आहे. वास्तवात साक्षात पंढरीमध्येच नाट्यसंमेलन होत असूनही अनेक रंगकर्मी संमेलनाऐवजी आपापले व्यावसायिक प्रयोग करण्यातच मश्गुल राहणार आहेत. त्यामुळे संमेलनाला किती रंगकर्मी उपस्थिती लावणार, हा प्रश्न नाट्यक्षेत्रात उपस्थित झाला आहे. बोलाची कढी आणि बोलाचाच भात, असा प्रकार असल्याची चर्चा नाट्यवर्तुळात आहे.
नाट्यसंमेलनाच्या काळात तरी निदान रंगकर्मींनी व्यावसायिक प्रयोग बंद ठेवावेत आणि संमेलनाला यावे, असा संकेत आहे. मात्र प्रत्यक्षातले चित्र निराळेच आहे. रसिकांचा लाडका प्रशांत दामलेसुद्धा दोन फेब्रुवारीला प्रयोग करणार आहे. आश्चर्य म्हणजे प्रशांत स्वत: नाट्यनिर्माता संघाचा अध्यक्ष आहे. पुणे नाट्यनिर्माता संघाच्या प्रमुख भाग्यश्री देसाई यांनीही याच काळात प्रयोग जाहीर केला आहे.
दरम्यान, नाट्य परिषद मध्यवर्तीने रंगकर्मी तसेच निर्मात्यांना किमान एक फेब्रुवारीला तरी प्रयोग बंद ठेवावेत, असे आवाहन केले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत पुण्या-मुंबईत प्रयोग जाहीर झाले आहेत. नाट्यसंमेलन हा सर्वस्वी रंगकर्मींचा उपक्रम असल्याने त्यासाठी रंगकर्मींनी उपस्थित राहावे, ही नाट्य परिषदेची आणि रसिकांचीही अपेक्षा आहे. तसा प्रघातही पाळला जातो, ही परंपरा असताना परिषदेच्या आवाहनाला आणि रसिकांच्या अपेक्षांना धुडकावत काही रंगकर्मींनी लावलेले प्रयोग वादाच्या व टीकेच्या भोव-यांत सापडले आहेत.
संमेलनाची तारीख नंतर जाहीर झाली
निर्मात्यांना किमान चार महिने आधी नाट्यगृहांच्या तारखा ठरवाव्या लागतात. त्यामुळे आम्ही आॅक्टोबरमध्येच आरक्षण करून प्रयोग ठरवले आहेत. संमेलनाच्या तारखा त्यानंतर जाहीर झाल्या. त्यामुळे आता बदल करणे शक्य नाही.’प्रशांत दामले, अभिनेते व नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष