आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. वि.भा.देशपांडे यांचे पुण्यात निधन, 78वर्षी घेतला जगाचा निरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मराठी नाट्यसृष्‍टीतील ज्येष्ठ समीक्षक डॉ. विश्वनाथ भालचंद्र देशपांडे (डॉ. वि. भा. देशपांडे) यांचे आज (गुरुवारी) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नातू असा परिवार आहे.  डॉ. देशपांडे यांनी मराठी नाट्यसृष्टीत आपल्या लिखाणाच्या माध्यमातून मोलाची भर घातली होती.

गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास वि.भा. देशपांडे यांची प्राणज्योत मालवली. ते 75 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून सायंकाळी 4 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
 
देशपांडेंवर झाली होती गुंतागुंतीची शस्त्रक्रिया...
हृदयातील झडप निकामी झाल्याने देशपांडे यांच्या काही दिवसांपूर्वी मोठी शस्त्रक्रिया करण्‍यात आली होती. या गुंतागुंतीची शस्त्रक्रियेत हृदयातील झडप यशस्वीपणे बदलण्यात आली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा,  वि.भा. देशपांडे यांचा परिचय...त्यांना मिळालेले पुरस्कार...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...