आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही; विश्वास देताना डी.एस.कुलकर्णी भावनाविवेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- डीएसके हा समूह शून्यातून उभा राहिला असून त्यासाठी गेल्या ४८ वर्षांपासून अविरत प्रयत्न करण्यात अाले अाहेत. सध्या १३ गृहप्रकल्पांचे ४८ लाख स्क्वेअर फुटांचे बांधकाम सुरू असून अागामी तीन महिन्यांत ते पूर्ण हाेऊन २ हजार काेटी रुपये यातून उभे राहतील. त्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जातील. कंपनीचा काेणताही व्यवसाय ताेट्यात नसून काेणाला फसवून कुठे पळून जायला मी विजय मल्ल्या नसल्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी  भावनाविवेश हाेत मंगळवारी सांगितले. या वेळी डीएसके यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी व मुलगा शिरीष कुलकर्णी उपस्थित हाेते.

     
कुलकर्णी म्हणाले, जानेवारी २०१६ ते अाॅक्टाेबरपर्यंत अापण थकबाकी असलेल्या अनेक गुंतवणूकदारांचे २५० काेटी रुपये परत केले असून  त्यानंतर पैशाची चणचण असूनही चालू वर्षात गुंतवणूकदारांना ३० काेटी रुपये देण्यात अाले अाहेत. टाेयाेटा कंपनीतील पैसे अाम्ही गुंतवणूकदारांना दिले असून गुंतवणूकदारांसाठी अाम्ही अामच्या टाेयाेटाच्या डीलरशिपसाेबत १२ ते १३ शाेरूमचा बळी दिल्याचेही ते म्हणाले.


एसअायटी नेमल्यास अापली हरकत नाही  
नाेटबंदीमुळे अामच्या व्यवसायावर परिणाम झाला. मात्र, नाेटबंदीचा निर्णय चांगला असून अागामी दाेन वर्षांत नाेटबंदीचे चांगले परिणाम दिसतील. जीएसटीचेही अाम्ही स्वागत करताे. गुंतवणूकदारांनी शासनाकडे डीएसकेतील व्यवहारांच्या तपासणीसाठी एसअायटी नेमा, अशी मागणी केली अाहे. सरकारने एसअायटी नेमल्यास अाम्ही त्याचे स्वागतच करू. व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी सीए नेमल्यास हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

DSK  उवाच...वाचा काय काय म्हणाले पत्रकार परिषदेत...

- येस, पॉझिटिव्ह दिशेने आमचा प्रवास सुरु झाला आहे.
- आम्ही सगळ्यांचे पैसे परत करणार आहोत. 
- जानेवारी 2016 ते ओक्टोबर पर्यंत गुंतवणुकदारांचे अडीचशे कोटी रुपये परत केले.

- त्यानंतर आम्हाला पैशांची चणचण सुरु झाली.

- टोयोटा कंपनीतील पैसे आम्ही गुंतवणुकदारांना दिले. गुंतवणुकदारांसाठी आम्ही आमच्या टोयोटा डीलरशीपचा बळी दिला.
- माझ्याबाबत अफवा पसरवण्यात आल्या. त्यामुळे अडचणींमधे वाढ झाली.
- मी रागाच्या भरात पत्नी हेमंतीला मुर्ख म्हणालो. तेरा ग्रुहप्रकल्पांच काम सुरु आहे. हे प्रकल्प काही महिन्यांत पुर्ण झालं की त्यातुन दोन हजार कोटी रुपये उभे राहतील. त्यातुन गुंतवणुकदारांचे पैसे दिले जातील.
-  2020 पर्यंत गुंतवणुकदारांना 589 कोटी रूपये द्यायचे आहेत. हे पैसे तेरा प्रकल्पांमधुन दिले जातील.
-  ड्रीम सिटी प्रकल्पातुन दहा हजार कोटी रुपये उभे राहतील.
 मी गुंतवणुकदारांना माझ्या ऑफिसच्या बेसमेंटमधे भेटत होतो. त्यातुन गोंधळ वाढला. मात्र बातम्या दिल्या की डी एस के पळुन गेले. 
- शुन्यातुन मी हा उद्योग उभारलाय. ( डी एस के भावुक, डोळ्यात अश्रू ) ऑक्टोबरपर्यंत आम्ही या अडचणीतून बाहेर आलो होतो, मात्र पोलिसांमध्ये तक्रार झाली आणि अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली.
- टोयोटाच्या शोरुम आम्ही पुन्हा सुरु करु. आम्ही गुंतवणुकदारांचे आणि बॅंकांचे पैसे परत करणार आहोत.
- येस...वन्स अगेन वी आर हेडींग टुवर्डस सक्सेस...आम्ही पुन्हा फिनीक्स पक्षांप्रमाणे भरारी घेऊ.
-  बंद पडलेले आमचे ग्रुहपकल्प सुरु करत आहोत. ते पुर्ण झाले की या प्रकल्पांमधे फ्लॅट बुक केलेल्यांना फ्लॅट मिळतील. ( आधी घर मग पैसे या योजनेमधे चार हजार लोकांनी डी एस केंच्या प्रकल्पांमधे फ्लॅट बुक केले होते. पजेशन मिळेपर्यंत बॅंकांचे हप्ते डी एस के भरणार होते. त्यासाठी ग्राहकांनी टाट कॅपिटलकडून घेतलेले लोन डी एस केंनी वापरले. मात्र ग्राहकांना घरे मिळाली नाहीत.) 
- बॅंकांनी मालमत्तांचा ताबा घेतला असला तरी त्याचा आमच्या व्यावसायावर काहीही परिणाम होणार नाही.
- मी एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना एक वर्षापुर्वी भेटलो होतो. ड्रीम सीटीसाठी आम्ही गुंतवणूकदार शोधत आहोत. त्या अध्यक्षांनी माझ्या सोबत एका मोठ्या बिल्डरला फोन लावला. मात्र त्या बिल्डरने रिसेशनमुळे (मंदी) गुंतवणूक करण्यास नकार दिला. 
- आत्ता परदेशी गुंतवणुकदारच आमच्याकडे गुंतवणुक करु शकतात.
 डी एस के ड्रीम सीटीची जागा खरेदी करताना आम्ही कोणतीही अनियमितता केली नाही.
- आमच्या कुटुंबाने ड्रीम सिटीची जागा खरेदी करुन ती डी एस के डेव्हलपर्सला विकली हे खरे आहे. या व्यवहारातुन आम्हाला पाच ते दहा टक्के नफा झाला. 
- माझ्या मोठ्या भावाचा जावई केदार वाजपे माझ्या विरोधात माहिती पुरवतो.

- नोटबंदीमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला. मात्र नोटबंदीचा निर्णय चांगला होता. दोन वर्षांमधे नोटबंदीच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसायला लागतील. 
- नोटबंदीचे तत्कालीन परिणाम आम्हाला सोसावे लागले. मात्र नोटबंदीमुळे आम्ही अडचणीत आलो असे नाही.

-  शासनाने नेमलेल्या एसआयटीचे आम्ही स्वागत करतो.

बातम्या आणखी आहेत...