आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dsk Gappa Kumar Ketkar On Current Political Scenario

पंतप्रधानपदाचे दावेदार ना राहुल गांधी ना नरेंद्र मोदी- कुमार केतकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘नव्या लोकसभेत कॉँग्रेस किंवा भाजपचे सरकार येणार नाही. त्यामुळे राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची सूतराम शक्यता दिसत नाही,’ असे मत दिव्य मराठीचे संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केले. कॉँग्रेस किंवा भाजप यांचे सरकार येणार नाही. दोन्हीपैकी एकाच्या पाठींब्यावरचे सरकार निवडून येईल, असा अंदाज केतकर यांनी वर्तविला. गुरूवारी सायंकाळी पुण्यात ‘डीएसके गप्पा’ या कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांनी केतकर यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत. नव्या लोकसभेचे चित्र कसे असेल, या प्रश्नावर केतकर म्हणाले, ‘सध्याचे यूपीएचे राज्य सहजगत्या निवडून येईल असे वाटत नाही. कॉँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांची अवस्था 1996 सारखी झालेली दिसेल. दोघांच्याही संख्याबळात फारतर वीसचा फरक पडेल. त्यामुळे या दोघांपैकी एकाच्या पाठिंब्यावरचे सरकार निवडून येईल. कॉँग्रेसइतकीच दुफळी भाजपमध्येही आहे. वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने लोकसभेत आजवरच्या सर्वोच्च 182 जागा जिंकल्या होत्या. वाजपेयींपेक्षा मोठी प्रतिमा असलेली कोणी नेता भाजपमध्ये आता दिसत नाही. नरेंद्र मोदी यांना त्यांच्याच पक्षातून कमालीचा विरोध आहे.

पारदर्शक आणि तत्पर राजकारणी ही बाळासाहेब ठाकरे यांची ओळख होती. राजकारणी’ म्हटले की चटकन शरद पवारच आठवतात. पवारांकडे अजिबातच पारदर्शकता नाही, असे मतही केतकरांनी मांडले. संपादकीय लेखनात कम्युनिस्ट, समाजवादी आणि संघ परिवाराच्या धोरणांवर आघात केले. परंतु, कोणाचीही व्यक्तीगत हेटाळणी किंवा व्यक्तीगत तिरस्कार लेखनात येऊ देत नाही, असेही त्यांनी सांगितले.

आचार्य अत्रे यांचे संस्कार- संयुक्त महाराष्ट्राची चळवळ टीपेला पोचली असताना ‘अग्रलेख म्हणजे अत्रे’, ‘मराठी म्हणजे अत्रे’ असेच वातावरण महाराष्ट्रात होते. आचार्य अत्रे यांच्या प्रोत्साहानातून त्यांच्या मराठा’मध्येच मी माझा पहिला मराठी लेख लिहिला. माझ्यावर पहिला संस्कार अत्रे यांचा असल्याचे मी मानतो. इंग्रजीमध्ये टाईम्स ऑफ इंडियाचे संपादक शामलाल, गिरीलाल जैन आणि त्यानंतर अर्थातच गोविंदराव तळवलकर यांचा संस्कार माझ्यावर झाला, असे केतकर म्हणाले.