आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसके ग्रुपकडून नीरज फाउंडेशनची स्थापना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कारला २५ मे राेजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात हाेऊन त्यांचा चालक नीरजसिंग हा ठार झाला होता. त्यानंतर डीएसके ग्रुपकडून द्रुतगती महामार्गावर रस्त्याचे व्यवस्थापन व जनजागृतीसाठी नीरज लाइफलाइन फाउंडेशनची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष डाॅ. शरद हर्डीकर यांनी िदली.

हर्डीकर म्हणाले, अपघातांसाठी मानवी चुकांबराेबरच रस्त्याच्या व्यवस्थापनाकडे झालेले दुर्लक्षही कारणीभूत असते. याेग्य व्यवस्थापनाच्या साहाय्यानेच वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. यासाठीच नीरज फाउंडेशनकडून मार्गदर्शन केले जाणार अाहे. याअंतर्गत नीरज लाइफलाइन व नीरज ड्रायव्हिंग स्कूलची स्थापना करून छाेट्या गाड्यांपासून ट्रक, कंटेनर्ससह सर्व चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार अाहे. फाउंडेशनचे विश्वस्त विवेक वेलणकर म्हणाले, २८ जून राेजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात डीएसके यांच्या वाढदिवसाच्या दिवशी फाउंडेशनची स्थापना हाेईल. या वेळी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री िदवाकर रावते, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे अादी उपस्थित राहणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...