आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • DSK Joins In Aap, May Contest Loksabha From Pune

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक \'डीएसके\' आपमध्ये, पुण्यातून लोकसभेसाठी इच्छुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. डीएसके यंदा आपच्या तिकीटावर पुण्यातून उमेदवारी मागणार आहेत. 2009 साली त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढली होती. मात्र त्यांना पराभव पत्कारावा लागला होता.
दरम्यान, माजी सनदी अधिकारी अरूण भाटिया यांनीही आपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनीही पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याचबरोबर आपण मुंबईतूनही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.