आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे परीक्षेस डमी उमेदवार; 4 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे लाेहमार्ग पाेलिस शिपाई भरती प्रक्रियेदरम्यान, लेखी परीक्षेस डमी उमेदवार बसविल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. याप्रकरणी अाैरंगाबाद, बीड येथील चार तरुणांविराेधात खडकी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दाेघांना अटक करण्यात अाली अाहे.

बळीराम उत्तम राठाेड(२६,रा.िनलज गावतांडा, ता.पैठण), अविनाश नारायण घुले (२६,रा.काेरेगाव, ता.केज,बीड) अशी आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्यासह करतारसिंह कवाडे (२४,रा.बेबल्याचीवाडी, जि.अाैरंगाबाद) गणेश जारवाड यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. याबाबत नंदकुमार घाेरपडे (५४,रा.काेंढवा,पुणे) यांनी पाेलिसांकडे िफर्याद दाखल केली.

पुणे लाेहमार्ग पाेलिसांतर्फे पाेलिस शिपाई भरती प्रक्रिया सुरू करण्यात अाली हाेती. त्यास पुणे मुख्यालयात १९ एप्रिल २०१६ राेजी लेखी परीक्षा घेण्यात अाली. या परीक्षेस बळीराम राठाेड याचे नावाने लेखी परीक्षेस त्याचे मित्र बसले हाेते. तर शारीरिक चाचणी ही त्याने स्वत:च दिली हाेती.
दरम्यान,शासकीय दस्तएेवजावर सही करून, डमी उमेदवार बसवण्याचा कट करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून खडकी पाेलिस स्टेशनचे पाेलिस उपनिरीक्षक मदन कांबळे पुढील तपास करत अाहे.